साहित्य समीक्षा
मराठी भाषेतील कोणत्याही प्रकारच्या साहित्याची समीक्षा करत रहाणे हा आमचा स्वभावधर्म आहे. त्यामुळे अनेक पुस्तकांचे परिचय , क्वचित प्रसंगी रसग्रहण, अनेकदा टीका व समीक्षा लेखन होत होते.
पण समीक्षा हा विषय मी गंभीरपणे कधी घेतला नव्हता. आता वाचनात आलेल्या प्रत्येक साहित्याची समीक्षा करणे हा एक छंद होऊन जाणार आहे. समीक्षा करणे हा माझा आवडता उद्योगही आहे.
तेव्हा केवळ साहित्य या विषयाला पूर्णपणे वाहिलेला हा ब्लॉग सुरु करतो आहे.
या ब्लॉगवर सध्या तरी जाहिरातींना फाटा देणार आहे. काही वर्षांनी कदाचित ब्लॉग तेवढा भरला तर विचार करता येईल.
पण सध्या तरी केवळ साहित्यातील उत्तमोत्तम कलाकृतींची समीक्षा करणे हा निर्भेळ हेतू या ब्लॉगमागे आहे.
धन्यवाद,
सागर